
Lokmat News – नोकरी सोडली आणि सुरू केला ‘हा’ नवा स्टार्टअप, काही वर्षांतच झाला करोडपती.
नोकरी सोडली आणि सुरू केला ‘हा’ नवा स्टार्टअप, काही वर्षांतच झाला करोडपती
आद्विक यानी अनोखा. जसं नाव तसंच उत्पादनही. भारतात पहिल्यांदा उंटाच्या दुधापासून पदार्थ बनविणारा स्टार्टअप सुरू केला आहे आद्विक या तरुणाने. ज्याचे नाव आद्विक फूड आहे. 2016 मध्ये सुरू झालेल्या या स्टार्टअपने फक्त लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला नाही तर वाळवंटात उंटांना जगवण्यासाठी मदत केली आहे. राजस्थान, गुजरातमधील अनेक भागांमधील लोकांना उंटाच्या दुधाचे फायदे माहिती आहेत. मात्र आद्विक फूडने याला एक मोठं बाजार उपलब्ध करुन दिलं आहे. विविध नोकऱ्यांमध्ये काम केल्यानंतर हितेश राठी आणि श्रेय कुमारने काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला. उंटाच्या दूध प्रोसेसिंगमधून सुरू झालं Aadvik Foodsची सफर. अर्थात हा नवा स्टार्टअप त्यांच्यासाठी इतका सोपा नव्हता.
शेतकऱ्यांना फायदा – आज या स्टार्टअपअंतर्गत तब्बल 150 शेतकऱ्यांचा सहभाग आहे. ज्या 150 शेतकऱ्यांसोबत आद्विक काम करीत आहे, त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. आणि ते उंटांची संख्या वाढवण्यासाठी काम करीत आहेत. आद्विक फूड्स आतापर्यंत 2 लाखांहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचला आहे. Read More